ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी वसंतदादा कारखान्यावर धडक दिली. आक्रमक कार्यकर्त्यांकडून कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न पोलीसांनी रोखला. यावेळी कार्यकर्ते व पोलीसांमध्ये झटापट झाली.