पेट्रोल-डिझेल टँकर चालकांचा संप मागे, पोलीस बंदोबस्तात टँकर रवाना होणार
मनमाड (प्रतिनिधी) - देशात नवीन वाहन कायदा येणार आहे. या कायद्यातील तरतुदीच्या विरोधात ट्रक, टँकर चालकांनी नवीन वर्षापासून संप पुकारला. आज संपाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांना होणार इंधन पुरवठा विस्कळीत झाला. यामुळे मनमाड डेपोतून इंधनाचे टँकर निघावे, यासाठी सातत्याने दोन दिवसांपासून बैठका सुरु होत्या. अखेर या हालचालींना यश आले आहे. मंगळवारी मनमाड येथे जिल्हाधिकारींनी टँकर चालक, मालक यांची बैठक घेतली. त्यात तोडगा निघाला आहे. मनमाड येथील एचपीसीएल, बीपीसीएल, इंडीयन ऑईल आणि गॅस प्लँटमधून गरज पडल्यास बंदोबस्तात टँकर रवाना होणार आहेत.
राज्यातील इंधनाची वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांनी देशव्यापी संपात सहभाग घेतला आहे. सोमवारपासून हा संप सुरु झाला आहे. या संपात मनमाड येथील डेपोमधील चालक मालक सहभागी झाले होते. आता जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी संप मागे घेतला आहे.
देशात नवीन वाहन कायदा येणार आहे. या कायद्यातील तरतुदीच्या विरोधात ट्रक, टँकर चालकांनी नवीन वर्षापासून संप पुकारला. संपाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांना होणार इंधन पुरवठा विस्कळीत झाला. यामुळे मनमाड डेपोतून इंधनाचे टँकर निघावे, यासाठी सातत्याने दोन दिवसांपासून बैठका सुरु होत्या. अखेर या हालचालींना यश आले आहे. मंगळवारी मनमाड येथे जिल्हाधिकारींनी टँकर चालक, मालक यांची बैठक घेतली. त्यात तोडगा निघाला आहे. यामुळे केंद्र शासनाने आणलेल्या नवीन वाहन कायद्याच्या विरोधात ट्रक, टँकर चालकांनी देशव्यापी संप सुरु केला आहे. या संपात महाराष्ट्रातील ट्रक आणि टँकर चालक सहभागी झाले आहेत. यामुळे राज्यातील पेट्रोल पंपांना होणार इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे.
नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले की, पेट्रोल आणि डिझेल ही जीवनावश्यक बाब आहे. यासंदर्भात बैठकीत सर्व बाबी टँकर चालक-मालकांना लक्षात आणून दिले. यावेळी टँकर चालकांनी संपातून माघार घेण्याची तयारी दर्शवली. परंतु कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर अडचण येईल, ही शंका मांडली. यावेळी गरजेनुसार टँकरला पोलीस संरक्षण देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर संप मागे घेतला गेला असून येत्या काही तासांत मनमाड डेपोतून टँकर रवाना होणार आहे. बैठकीत जिल्हाधिकारींनी चालकाच्या समस्या सोडवण्यास तयार दर्शवली.