नमो चषक २०२४ क्रीडा स्पर्धांचा थाटात शुभारंभ; शनिवारी होणार अजून दहा खेळांची सुरुवात
                                             
                                                Xtreme News India  
                                            
                                                20-01-2024 11:22:58  
                                                
                                                90101 
                                        
                                        
                                            नमो चषक २०२४ क्रीडा स्पर्धांचा थाटात शुभारंभ; शनिवारी होणार अजून दहा खेळांची सुरुवात
हर्ष पाटील सर्वात वेगवान धावपटू 
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) -  केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या पुढाकाराने आयोजित नमो चषक २०२४ क्रीडा स्पर्धांची सुरुवात विभागीय क्रीडा संकुलात शुक्रवारी झाली. १४ वर्षे वयोगटात सर्वात धावपटू म्हणून हर्ष पाटीलने १०० मीटर गटात अव्वल स्थान पटकावले. त्याने अवघ्या १३.१४ सेकंदात हा पराक्रम केला. 

तब्बल ५३ खेळांचा आणि विविध वयोगटांचा समावेश असलेल्या या स्पर्धेला आज विभागीय क्रीडा संकुलात सुरुवात झाली. संकुलातील संपूर्ण वातावरण खेळमय झाले जेव्हा सर्व नऊ खेळांचे सामने एकत्रितपणे मैदानावर सुरु झाले. शुक्रवारी ऍथलेटिक्स, फुटबॉल, कबड्डी, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस, आदी खेळांचे सामने एकत्रितपणे सुरु झाले. टेनिस, बास्केटबाँल, फुटबॉल, ऍथलेटिक्स आदी खेळांच्या सामन्यांची सुरुवात करून दिली. 

१४ वर्षे वयोगट १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या हर्ष पाटीलने आपले अव्वल स्थानावर आपले नाव कोरले. त्याने अवघ्या १३.१४ सेकंदात ही शर्यत पूर करून या यशाला गवसणी घातली. धावण्यातील अन्य विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे: सहजवीरसिंग बग्गा, श्रीष्टी मिटगे, अनिकेत जंगले, कल्याणी तुपे, अनिकेत सांगळे, कल्याणी तुपे, अनिकेत सांगळे, रेवती तुपे, रामेश्वर मुंजाळ, भारती ठोकळ, शुभम गायकवाड, आरती ठोकळ, रोहित वैद्य, सुहानी खोब्रागडे, जयश्री नरवडे, गौरव भांडेरकर, प्रमोद पाटील. 
फुटबॉल (१७ वर्षांखालील) साखळी फेरीतील पोदार (सीबीएसई) आणि द जैन या संघांदरम्यानची लढत ही टायब्रेकर मध्ये गेली. द जैन च्या प्रसन्न. जी, हर्ष घुनावत, सोहम राऊत, आणि आदित्य साळवे यांनी प्रत्येकी गोल करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. फुटबॉलमध्ये पॅरामाउंट, पीएसबीए, पोदार (आयसीएसई), राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिक शाळा, स्टेपिंग स्टोन्स, संमतभ्रद (वेरूळ) संघानी प्रतिस्पर्धीण मात देत विजय साकारला. 

बास्केटबाँल (१२ वर्ष मुले, मुली) गटात सिबा या टीम ने तीन सामने पटकावून आपला दबदबा कायम राखला. याशिवाय एमएसडी, डीसीबीए आणि एसकेएम संघानी स्पर्धेत विजय साकारले.   
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी छत्रपती संभाजीनगर ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, सचिव गोविंद शर्मा, हर्षवर्धन कराड, रामेश्वर भादवे, हिमांशू गोडबोले, माणिक राठोड, मनजीतसिंग दरोगा, मोहम्मद रियाजुद्दीन, पूनम नवगिरे, शेख मोसीन आदी प्रयत्नशील आहेत. 
शनिवारी सुरु होणारे खेळ पुढीलप्रमाणे: विभागीय क्रीडा संकुल - हँडबॉल, ड्रॉपबॉल, रायफल शूटिंग, मल्लखांब, रोप मल्लखांब, एरोबिक जिम्नॅस्टिक, तिरंदाजी, कॅरम. सिद्धार्थ जलतरण तलाव - जलतरण. एन-३ - लॉन टेनिस.
 
                                            
                                         
                                       
                                          Contact For News & Advertisement.