मुलांच्या गटात तन्मय मुजुमले विजेता तर मुलींमध्ये शमिका उभे विजेती
Xtreme News India
11-01-2024 18:05:03
113723
जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा
मुलांच्या गटात तन्मय मुजुमले विजेता तर मुलींमध्ये शमिका उभे विजेती
पुणे (क्रीडा प्रतिनिधी) - क्रीडा भारती व शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेतील मुलांच्या गटात तन्मय मुजुमले याने तर मुलींच्या गटात शमिका उभे हिने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.
ही स्पर्धा पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीच्या पटवर्धन बाग येथील मैदानावर (श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानासमोर) आयोजित केली होती. दोरीवरील मल्लखांब व पुरलेला मल्लखांब या दोन्ही प्रकारातील एकत्रित कामगिरीच्या आधारे विजेतेपद देण्यात आले.
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक केळकर हाऊसिंग कंपनीचे संचालक अनिरुद्ध केळकर यांच्या हस्ते झाला.कार्यक्रमास क्रीडा भारती पुणे महानगर अध्यक्ष शैलेश आपटे, अर्जुन पुरस्कार विजेत्या कबड्डीपटू शकुंतला खटावकर, क्रीडा भारतीचे पुणे महानगर मंत्री विजय रजपूत, पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष सत्यजित शिंदे, शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीच्या संचालिका अनुराधा येडके व राज तांबोळी, मल्लखांब प्रशिक्षक जितेंद्र खरे आणि रवींद्र पेठे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक मेहेंदळे यांनी केले.स्पर्धेमध्ये २७४ खेळाडूंनी भाग घेतला होता.
स्पर्धेतील गटवार निकाल असे-
मुले- १. तन्मय मुजुमले १५.९५ गुण (शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमी), २. आर्यन पाळंदे १५.७ गुण (नवजीवन स्पोर्ट्स),३. ओम लखाशे १५.५५ गुण ४. अथर्व मोरे १५.४५ गुण (दोन्ही महाराष्ट्रीय मंडळ),५. रेवणसिद्ध कोरे १५.२५ गुण,६. सर्वेश देशपांडे १५.१० गुण (दोन्ही इंद्रायणी स्पोर्ट्स अकादमी)
मुली १.शमिका उभे १५.६५ गुण(मल्लखांब स्पोर्ट्स अकादमी),२. तनया साळवी १५ गुण (पुणे स्पोर्ट्स अकादमी),३.अवनी हुले १४.६ गुण (मल्लखांब स्पोर्ट्स अकादमी) ४.अन्वी म्हसवडे १४.५०गुण (वेदांत अकादमी),५. अर्णवी नाईक १४.०५ गुण (इंद्रायणी स्पोर्ट्स अकादमी),६.मधुरा दीक्षित १३.६५ गुण (मल्लखांब स्पोर्ट्स अकादमी)
Contact For News & Advertisement.