Editor: Mr. Shrikrishna Aayacit, Executive Editor: Mr. Sanjaykumar Joshi
 Top Advertisement's

 Other Sport

कोल्हापूरच्या समेद शेट्येने खासदार चषक जिंकला

Xtreme News India   26-12-2023 15:46:38   117578

कोल्हापूरच्या समेद शेट्येने खासदार चषक जिंकला

 

कोल्हापूर, २६  डिसेंबर (UNI) -  शहरातील आंतरराष्ट्रीय मास्टर समेद शेट्ये याने सोमवारी राजमाता जिजाऊ सभागृह (शिवाजी विद्यापीठ) येथे झालेल्या ऑल इंडिया ओपन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत सातव्या क्रमांकाच्या मुदस्सर पटेलचा पराभव करून खासदार (एमपी) चषक जिंकला.स्विस लीग फॉरमॅटमध्ये खेळत शेट्येने अंतिम नवव्या फेरीनंतर नऊ पैकी 8.5 गुणांसह विजेतेपद पटकावले आणि चषकासह 15,000 रुपयांचे रोख पारितोषिक जिंकले.

    तर मिरज शहरातील मुदस्सर पटेल आठ गुणांसह प्रथम उपविजेता ठरला आणि त्याला ट्रॉफीसह 12,000 रुपयांचे रोख पारितोषिक मिळाले.आठव्या क्रमांकाचा पुण्याचा नमित चव्हाण आठ गुणांसह दुसरा उपविजेता ठरला, त्याला रोख 8,000 रुपये आणि चषक देण्यात आला.धनंजय महाडिक युवाशक्तीचे अध्यक्ष पृथ्वीराज महाडिक व वैष्णवी महाडिक यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.चेस असोसिएशन कोल्हापूर आणि भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकाराने अन्यज चेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


Contact For News & Advertisement.


 Your Feedback



 Advertisement