Editor: Mr. Shrikrishna Aayacit, Executive Editor: Mr. Sanjaykumar Joshi
 Top Advertisement's

 Crime Division

ड्रग्ज प्रकरणी पुण्यातील आणखी 50 माफियावर संशय ; शोधमोहीम सुरु - पोलिस आयुक्तांनी दिली माहिती

Xtreme News India   02-03-2024 21:17:05   1212510

ड्रग्ज प्रकरणी पुण्यातील आणखी 50 माफियावर संशय ; शोधमोहीम सुरु - पोलिस आयुक्तांनी दिली माहिती

पुणे (प्रतिनिधी) - ड्रग्स तस्करी प्रकरणी ड्रग्स विक्री करणारे तब्बल ५० जन पुणे पोलिसांच्या रडारवर आहेत. या साठी राज्यभरात मेट्रो शहरात पुणे पोलिसांचे पाठक शोध मोहीम राबवणार आहे. पुणे पोलिसांनी कुरकुंभ एमआयडीसीत मोठी कारवाई करत ड्रग्स निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला. तसेच, दिल्ली, सांगली, सोलापूर या ठिकाणी देखील कारवाई करत तब्बल ३ हजार ५०० कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले. या प्रकरणी आता पर्यंत ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ड्रग्स विक्री करणारे रेटेल विक्रेत्यांचा शोध पुणे पोलिस घेत असून तब्बल ५० जण पुणे पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांना अटक करण्यासाठी राज्यातील मेट्रो शहरात शोध मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

 

पोलिस निरीक्षक ड्रग्ज प्रकरणी अटकेत

पिंपरी-चिंचवड मधील सापडलेल्या २ कोटी ड्रग्स तस्करी प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षकाचा सहभाग असल्याचे आढळले असून त्याच्या कडून ४५ कोटी रुपयाचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. सांगवीत पकडलेल्या झा या इसमाच्या माध्यमातून या प्रकारात एका पोलिस निरीक्षकाचा देखील हात असल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्या कडून ४५ कोटी रुपयांचे तब्बल ४४ कोटी रुपयांचे एमडी जप्त करण्यात आले आहे. पोलीसच ड्रग्स तस्करी करत असल्याने खळबळ उडाली आहे.

 

पिंपरी-चिंचवड परिसरात तब्बल २ कोटी रुपयांचे २ किलो ३८ ग्रॅम मेफेड्रोन जप्त 

 

 पुणे पोलिसांनी विश्रांतवाडी, कुरकुंभ, दिल्ली, सांगली येथे कारवाई करत तब्बल ३ हजार ५०० कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करत मोठे रॅकेट उद्ध्वस्त केल्याची घटना ताजी असतांना आता पिंपरी-चिंचवड परिसरात तब्बल २ कोटी रुपयांचे २ किलो ३८ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
 
मेफेड्रोन अमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका ड्रग्स तस्कराच्या मुसक्या सांगवी पोलिसांनी शुक्रवारी आवळल्या. सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रक्षक चौकात एका व्यक्तीकडून दोन कोटी दोन लाख रुपयांचे दोन किलो ३८ ग्रॅम मेफेड्रोन पोलिसांनी जप्त केले आहे. नमामी झा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे ५ च्या सुमारास पिंपळे निलख परिसरातील रक्षक चौकात एक व्यक्ति हा पांढरी पिशवी घेऊन थांबला होता. त्याच्या हालचाली पोलिसांना संशयित वाटल्या. याची माहिती सांगवी पोलिसांना देण्यात आली.
 
दरम्यान, पोलिसांनी रक्षक चौकात  सापळा रचत त्याला अटक करण्यात आली आहे. त्याची झडती घेतली असता, झा याच्याकडे असलेल्या पांढऱ्या पिशवीत २ कोटी २ लाखांचे २ किलो मेफेड्रोन ड्रग्स आढळले. पोलिसांनी हे ड्रग्स जप्त केले आहे. आरोपी झा कोणाला मेफ्रेड्रोन ड्रग्स देणार होता? त्याच्या पाठीमागे कोण आहे? हे प्रश्न अनुत्तरित असून पोलिस त्या दृष्टीने तपास करत आहेत.


Contact For News & Advertisement.


 Your Feedback



 Advertisement