Editor: Mr. Shrikrishna Aayacit, Executive Editor: Mr. Sanjaykumar Joshi
 Top Advertisement's

 Individuals

नेल्सन मंडेला .. एक प्रभावी नेते आणि राष्ट्राध्यक्ष!

Xtreme News India   05-12-2023 12:21:34   896924

व्यक्ती विशेष

नेल्सन मंडेला .. एक प्रभावी नेते आणि राष्ट्राध्यक्ष!

आज नेल्सन मंडेला यांची पुण्यतिथी. या निमित्ताने हा लेख शेअर करत आहे.

खरं म्हणजे 'खेळ' हा माझ्या जीवनाचं passion. लहानपणापासून अभ्यासातील माझी गती चांगलीच  आणि दहावी, बारावीत मी गुणवत्ता यादीत आल्यामुळे, स्कॉलरशिपच्या परीक्षेत जिल्हास्तरावर मी पहिल्या तिघांत उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना वाटायचं की 'अभ्यास' हे माझं passion असेल.  पण तसं अज्जीबातच नव्हतं. मला खेळायला खूप आवडायचं. इनडोअर आऊटडोअर असे सगळेच खेळ खेळायला मला प्रचंड आवडायचं. त्यातल्या त्यात मोकळ्या हवेत मारलेली फुटबॉलची किक, टेनिसचा स्ट्रोक, बॅडमिंटनचा शॉट किंवा टेबलटेनिसचा टॉप स्पिन मनासारखा जमल्यावर जो आनंद मिळायचा त्याची सर कशालाही येणार नाही. याशिवाय कॅरम, चेस, ब्रिज यासारख्या बैठ्या खेळांनीही मला तितकाच आनंद दिला. 

काही वर्षांपूर्वी 'invictus' हा अप्रतिम इंग्रजी चित्रपट पाहण्यात आला. तो पाहिल्यानंतर खेळाविषयीचं माझं प्रेम आणि आदर अधिकच वाढला. सन २०१० ला मी कुटुंबासमवेत दक्षिण आफ्रिकेत पर्यटनासाठी गेलो होतो.  तेथील केपटाउन, जोहान्सबर्ग, न्यास्ना या शहरात फिरल्यानंतर तेथील मोठे रस्ते, भव्य स्टेडियम आणि एकंदर सोयी सुविधा पाहून खूप धक्का बसला.  जो देश १९९०-९२ च्या सुमारास गुलामगिरीतून मुक्त झाला त्या देशाने इतक्या गतीने हा विकास साधत तो आपल्या पुढे निघून गेलाय हे वास्तव स्वीकारायला मन तयार नव्हतं.  या कात टाकलेल्या देशाचे खरे शिल्पकार असणाऱ्या  'नेल्सन मंडेला' या महान नेत्याला मी मनोमन सलाम केला. 

आम्ही दक्षिण आफ्रिकेला गेलो तेव्हा तिथे 'फिफा' विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते.  यासाठी जे मानकगीत तयार करण्यात आले होते त्या ‘शकीला’ या दक्षिण अमेरिकेतील Columbian  सुप्रसिध्द गायिकेच्या आवाजातील ‘WAKA WAKA .. THIS TIME FOR AFRICA’ या गाण्याने जगाला पुरते वेड लावले होते. दक्षिण आफ्रिकेचं ते बदलेलं रूप पाहून नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्वगुणांचा प्रत्यय वारंवार येत होता. त्यामुळे त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याचं कुतूहल माझ्या मनात निर्माण झालं.  मी तिथे त्यांचं चरित्र वाचायला घेतलं आणि त्यानंतर काही दिवसातच 'invictus' हा चित्रपट माझ्या पाहण्यात आला.  

पुनःप्रत्ययाचा आनंद देणाऱ्या कलाकृती ह्या बोटांवर मोजण्या इतक्या असतात. 'invictus' चित्रपट हा त्याच श्रेणीतला.  या शब्दाचा अर्थ 'undefeated' किंवा 'unconquered' म्हणजेच  'अपराजित'  असा होतो. आपल्या आयुष्यातील २8 वर्षे तुरुंगात राहूनही नेल्सन मंडेला हे 'अपराजित' च राहिले. प्रचंड संघर्षानंतर १९९४ साली दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधानपदाची सूत्रे त्यांनी स्वीकारली तेव्हा देश स्वतंत्र झाला तरी 'काळ्या - गोऱ्याचा' भेद हे कडवं आव्हान त्यांच्या समोर अजूनही उभं होतं. हा भेद कायमचा मिटवण्यासाठी त्यांनी जी खेळी केली ती अफलातून होती आणि या सत्यकथेवर आधारितच 'invictus' या चित्रपटाचं कथानक होतं. 

८५ टक्के लोक कृष्णवर्णीय आणि १५ टक्के लोक श्वेतवर्णीय ही तेथील आकडेवारी होती. त्यामुळे नेल्सन मंडेला जेव्हा या ८५ टक्के लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी होते आणि आता मंडेलांनी या गोऱ्या लोकांना आपल्या आसपासही फिरकू देऊ नये अशी तीव्र इच्छा या जनमाणसात असणं अगदीच स्वाभाविक होतं. एकीकडे बहुमताचा कौल  आणि दुसरीकडे सर्वजनतेविषयी समानतेने विचार हे देशाचे पंतप्रधान म्हणून असलेले कर्तव्य या दोहोंचाही समतोल राखणे हे मंडेला यांच्यासमोर आव्हानच होते. मात्र मंडेला यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर अत्यंत शांतपणे निर्णय घ्यायला सुरुवात केली. 

प्रशासनामध्ये अनुभवी लोकांची गरज भासेल म्हणून गोऱ्या लोकांना प्राधान्य हा त्यांचा पहिलाच निर्णय धक्कादायक ठरला. या विषयी त्यांच्या सुरक्षा रक्षकाने शंका उपस्थित केली तेव्हा ज्या पध्दतीने ते त्याला समजावून सांगतात तो प्रसंग विलक्षणीय आहे. दुसरा प्रसंग ही याच श्रेणीतला. नेल्सन मंडेला कैदेत असताना गोऱ्या अधिकाऱ्याने मंडेला यांच्या पत्नीला आणि मुलीला धक्काबुक्की केली होती. त्यामुळे त्या दोघीही स्पष्टपणे मंडेलायांच्या समोर रोष व्यक्त करतात. त्या म्हणतात की, "ज्या लोकांनी तुझ्या पत्नीला, मुलीला त्रास दिला त्यांच्याविषयी तुला राग का येत नाही?" यावर मंडेला शांतपणे आपल्या पत्नीला समजावतात कि, "हे बघ, ज्यावेळी त्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यावेळी ते क्वीन व्हीकटोरीयाचे नोकर होते. पण ते आता माझ्या देशाचे सेवक आहेत. तेव्हा या देशाचा पंतप्रधान म्हणून मी माझ्याच देशाच्या सेवकांचा राग कसा काय करू शकतो?" मंडेलांचा तो दृष्टिकोन  नक्कीच  प्रभाव टाकून जातो. 

हा चित्रपट आपल्या मनाची पकड घेत जातो. आपली उत्कंठा वाढवत जातो. मंडेला हे एका रग्बी स्पर्धेच्या उदघाटनासाठी जातात. तिथे त्यांच्या लक्षात येतं की हा खेळ आपल्या देशवासियांसाठी श्वासाइतकंच महत्वाचं आहे. पण त्याच वेळी त्यांना हेही लक्षात येतं कि आपल्या देशातील कृष्णवर्णीयांचा गोऱ्या लोकांविषयी इतका द्वेष आहे कि ते या गोऱ्यांविरुद्ध दुसऱ्या देशातील गोर्यांना देखील साथ देऊ शकतील. त्यांना या गोष्टीचं वैषम्य वाटतं आणि ते हा द्वेष कायमचा मिरवायचा ठरवतात.  योगा योगानं त्याच वर्षी रग्बी खेळाच्या विश्वचषकाचं यजमान पद हे दक्षिण आफ्रिकेला मिळालेलं असतं.  या संधीचा ते फायदा घ्यायचा ठरवतात.    स्वतः पंतप्रधान असतानाही ते रग्बीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत जातात. तेथील सर्व अधिकाऱ्यांना ते सांगतात कि पुढच्या वर्षी आपल्या देशात होणारा रग्बी या खेळाचा विश्वचषक आपल्याला जिंकायचा आहे. त्यावेळी तेथील क्रीडा अधिकारी  उपहासाने म्हणतात कि विश्वचषक जिंकायचं तर सोडाच  पण प्रतिपक्षाच्या मैदानात तरी आपले खेळाडू पोहचतात कि नाही याची शंका वाटते. तुलनेने बाकीचे देश बलाढ्य आहेत. आपल्याकडे तर साधं मैदानही उपलब्ध नाही. अशा परिस्थिती आपण विजयाची स्वप्न पाहणं केवळ अशक्य आहे. यावर मंडेला तेथे  जमलेल्या सर्वाना म्हणतात की, "आपण हा विश्वचषक जिंकणारच आणि त्यासाठी मी स्वतः लक्ष देणार आहे.'  यावर कोणीही कसलीच प्रतिक्रिया देत नाहीत. 

मंडेला सर्व देशाला एका सूत्रात बांधण्याचा प्रयत्न करतात. दक्षिण आफ्रिकेतील रग्बी खेळाडूंचे सर्व देशभर दौरे करतात. हा सगळा प्रवास दिग्दर्शकाने अत्यंत सुंदर रित्या चित्रित केला आहे. शेवटी एक वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघाना पराजित करून दक्षिण आफ्रिकेचा संघ विश्वचषक जिंकतो.  हा विजय संपूर्ण देश आनंदाने साजरा करतो. या आनंदाचा आवेग इतका अधिक असतो कि या आवेगात काळा-गोरा हा वर्षानुवर्षे चालत आलेला भेद कुठल्याकुठे वाहून जातो. एकमेकांचा द्वेष करणारे हे कृष्णधवल लोक एकमेकांच्या गळ्यात गळे घालून आपल्या देशाचा विजयोत्सव साजरा करतात.  आता तिथे कोण काळा, कोण गोरा हा भेदच उरत नाही. सगळीकडे एकच रंग दिसतो तो 'देशभक्तीचा'. 

ही काही कपोलकल्पित कथा नाही तर सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाचे कथानक आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या चित्रपटाची निर्मिती ही दक्षिण आफ्रिकेतील नव्हे तर आपल्या अभिनयानं जगाला वेड लावणाऱ्या हॉलिवूड चा सुपरस्टार Clint Eastwood Jr. यांनी केली. जो त्या देशाचा नसूनही मंडेलांचं हे कार्य, खेळाचं महत्व  त्याला या चित्रपटाच्या माध्यमातून सामान्य माणसांपर्यंत पोहचवावं असं वाटलं. Matt Damon  याने केलेली खेळाडूची भूमिका अप्रतिम आहे. पण Morgan Freeman याने केलेली नेल्सन मंडेलांची भूमिका तर केवळ शब्दातीत आहे.   

त्यामुळे १९९५नंतर दक्षिण आफ्रिकेने जी प्रगती केली त्यामध्ये निश्चितच या खेळाचा, या स्पर्धेचा मोठा वाटा आहे. हा चित्रपट सर्वांनी पहावा असाच आहे. यानिमित्ताने एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. खेळाडूंच्या अंगी जी खिलाडू वृत्ती आहे ती राजकारण्यांमध्येही आली तर जागतिक स्तरावर राष्ट्राचे स्थान अव्वल स्थानी जाण्यास वेळ लागणार नाही. त्याचप्रमाणे 'खेळ' माणसाचं आयुष्य कशाप्रकारे बदलू शकतो हे ही या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या निदर्शनास येते. म्हणूनच खेळ हा आता आपल्या जीवनाचा अपरिहार्य भाग बनावा, खेळासाठी मैदान उपलब्ध असावे, जनतेने प्रशासनाने मिळून त्याची निगा राखावी आणि संपूर्ण देशाचे संघ भावनेत रूपांतर व्हावे  ही भावना 'invictus' हा चित्रपट बघितल्यानंतर मनात प्रकर्षाने निर्माण झाली.

आज नेल्सन मंडेला यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा लेख आपल्याशी शेअर करताना एक वेगळीच सकारात्मकता मला जाणवत आहे आणि ती तुम्हालाही जाणवत असेल आणि संघ भावनेचा विचार तुमच्या मेंदूत आकार घेत असेल याविषयी मला शंका नाही.

 

©️श्रीकांत अनंतराव जोशी

माजी आमदार

मराठवाडा पदवीधर मतदार संघ


Contact For News & Advertisement.


 People's Feedback


Xtreme News India
📑 You have received 1 message(-s) № 733. Read - out.carrotquest-mail.io/r?hash=YXBwPTY0MDcyJmNvbnZlcnNhdGlvbj0xNzkzOTE5MzEwMDQ1OTA3OTA3JmFjdGlvbj1jbGlja2VkJnVybD1odHRwcyUzQSUyRiUyRnJlZGxpbmtiaXRzLnRvcCUyRmdvJTJGeTJiNDAzJTJGMjNiNCZyYWlzZV9vbl9lcnJvcj 22-10-2024 13:16:33

ywu0i9

Xtreme News India
📠 Notification: TRANSACTION 1,8216 BTC. Verify =>> https://telegra.ph/Go-to-your-personal-cabinet-08-25?hs=2c32aea7683fe63de0f40edd61be6b1b& 📠 01-12-2024 22:25:15

6w35t4


 Your Feedback



 Advertisement