शिखांचे नववे गुरू तेगबहादुर
(१६२१–११ नोव्हेंबर १६७५)
शिखांचा प्रारंभीचा इतिहास हा सगळा संघर्षमय आणि रक्तरंजित आहे. शिखांच्या धर्मगुरुंचे ज्वलंत आणि तेजोमय चरित्र हा शिखांचा मोठाच स्फूर्तिदायक ठेवा होय. सहावे शीखगुरू हरगोविंद यांचे गुरु तेग बहादुर सर्वांत धाकटे पुत्र होते. गुरु तेग बहादुर सिंह हे शिखांचे नववे गुरू होते. त्यांचा जन्म १८ एप्रिल १६२१ रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला होता. शिखांचे आठवे गुरू हरकिशन यांच्या मृत्युनंतर १६६४ मध्ये तेगबहादुर यांना नववे गुरू म्हणून शिखांनी गादीवर बसविले.
सहावे शीखगुरू हरगोविंद यांचे ते सर्वांत धाकटे पुत्र व शेवटचे दहावे गुरू गोविंदसिंग यांचे पिता. तेगबहादुरांचा जन्म पंजाबमध्ये अमृतसर येथे झाला. मातेचे नाव नानकी. वयाच्या आठव्या वर्षी कर्तारपूर येथील लालचंदजी खत्री यांची कन्या गुजरी हिच्याशी तेगबहादुरांचा विवाह झाला. त्यांचे मूळ नाव त्यागमल होते. लहानपणीच त्यांना वैराग्य प्राप्त झाले. गृहस्थ असूनही ते वडिलांच्या मृत्यूनंतर बकाला येथे जाऊन विरक्तवृत्तीने राहू लागले. शिखांचे आठवे गुरू हरकिशन यांच्या मृत्यूनंतर १६६४ मध्ये तेगबहादुर यांना नववे गुरू म्हणून शिखांनी गादीवर बसविले. तथापि त्यांचा भाऊ धीरमल व इतरांनी त्यांच्याशी गादीसाठी संघर्ष सुरू केला. नंतर तेगबहादुर अमृतसरला गेले, तेव्हा मसंदांनी (शीख धर्मप्रसारकांनी) हरमंदिराचा आधीच ताबा घेतला होता व तेथे भ्रष्टाचार माजविला होता. नंतर तेगबहादुर आपल्या वडिलांच्या गावी, किरतपूर येथे गेले. तेथेही त्यांना मसंदांनी व भाऊ बंदांनी खूप त्रास दिला. तेव्हा त्यांनी स्वतःसाठी शिवालिक पर्वतराजीत एक नगर वसविले आणि तेथे आपली गादी स्थापून ते धर्मप्रचारासाठी यात्रा करू लागले. हे नगर आनंदपूर म्हणून पुढे शिखांचे प्रसिद्ध व पवित्र क्षेत्र बनले. पाटणा येथे त्यांची दुसरी पत्नी गुजरी प्रसूत होऊन पुत्ररत्न झाल्याची वार्ता त्यांना आसामात कळली. हाच मुलगा पुढे शिखांचा दहावा व शेवटचा गुरू गोविंदसिंग म्हणून प्रसिद्धीस आला. तेगबहादुरांनी आसामपासून काश्मीरपर्यंत आपल्या धर्माचा प्रसार करून अनेक हिंदुंना व मुसलमांनानाही शीख धर्माची दीक्षा दिली. औरंगजेबला अर्थातच हे खपले नाही. त्याने काश्मीरच्या सुभेदारास तेथील सर्व हिंदूंना मुसलमान करण्याचा आदेश दिला. अशा वेळी तेगबहादुरांनी हिंदूंचे नेतृत्व केले. औरंगजेबाने त्यांना आग्रा येथे कैद केले व दिल्लीस आणून चांदणी चौकात त्यांचा शिरच्छेद केला. तेगबहादुरांचे शिर जैना नावाच्या एका भंग्याने पळवून आनंदपूरला आणले. तेगबहादुरांचे वधस्थान आज ‘सीसगंज गुरुद्वारा’ म्हणून प्रसिद्ध असून पवित्र मानले जाते. तेगबहादुरांच्या ह्या बलिदानाने सर्व पंजाब पेटून उठला. स्वधर्म व स्वाभिमान यांच्या रक्षणार्थ हजारो शीखवीर पुढे आले. तेगबहादुर शूर, साहसी पण मनाने अत्यंत कोमल व क्षमाशील होते.
विविध विषयांवर रचलेले तेगबहादुरांची ११६ पद्ये उपलब्ध आहेत. ही पद्ये पुढे गुरू गोविंदसिगांनी ग्रंथसाहिबात अंतर्भूत केली. यांतील ५९ पद्ये ‘शब्द’ (स्ताेत्रे) आणि ५७ पद्ये ‘श्लोक’ आहेत. त्यांच्या रचनेत वैराग्य व क्षमाशील वृत्तीचा उत्कृष्ट आविष्कार आढळतो.
अहिंसा व सत्याचा प्रेषित असलेल्या तेगबहादुरांनी धर्मासाठी बलिदान करून मानवी स्वातंत्र्याचा व स्वतःस पटेल तो धर्म आचरण्याचा आदर्श शीख धर्मात घालून दिला. त्यांच्या बलिदानाने शीख धर्मात जी अस्मिता निर्माण झाली तिला इतिहासात तोड नाही.
गुरु तेगबहादूर सिंहजी धार्मिक प्रचारासाठी आपल्या अनुयायांसह विविध ठिकाणी यात्रा करत असत. तेगबहादुरांनी आसामपासून काश्मीरपर्यंत आपल्या धर्माचा प्रसार करून अनेक हिंदुंना व मुसलमांनानाही शीख धर्माची दीक्षा दिली. औरंगजेबला अर्थातच हे खपले नाही. त्या काळात काश्मिरी पंडितांना औरंगजेबाच्या जुलमी सत्तेने हैराण करुन सोडले होते. औरंगजेब हिंदूंना सक्तीने मुस्लिम बनवत होता. मुसलमान होईपर्यंत कुणाही हिंदूंचा छळ केला जाई. हिंदू स्त्रियांना भ्रष्ट केले जाई. हिंदूंची मालमत्ता बळकावणे वा नष्ट करणे नेहमीच चालत असे. त्याने काश्मीरच्या सुभेदारास तेथील सर्व हिंदूंना मुसलमान करण्याचा आदेश दिला. छळ-कपटाची परिसीमा गाठली होती. ते काश्मिरी पंडित गुरु तेगबहादूर यांना शरण गेले. अशा वेळी तेगबहादुरांनी हिंदूंचे नेतृत्व केले. गुरु तेगबहादूरांनी औरंगजेबाला निरोप पाठवून ‘आधी तेगबहादूरांना मुसलमान कर मग सगळे काश्मिरी पंडित मुसलमान होतील’, असे कळविण्याची व्यवस्था केली. यानंतर औरंगजेबाच्या फौजेने गुरु तेगबहादूरांना अटक केली. औरंगजेबाच्या दरबारात गेल्यानंतर त्यांना वेग-वेगळ्या प्रकारे आमिष दाखवण्यात आले. गुरु तेगबहादुर यांनी इस्लाम धर्म स्वीकारावा यासाठी औरंगजेबाने त्यांना राजसभेत उच्च पदे देण्याची अनेक प्रलोभने दाखवली; परंतु गुरु तेग बहादुरजींनी त्याला नकार दिला. त्यानंतर त्यांना त्रास देण्यात आला. त्यांना कैद करून घेण्यात आले.
गुरु तेगबहादुर प्रतिज्ञेपासून विचलित करण्यासाठी त्यांच्यासमोर भाई मतिदास यांच्या शरिराचे करवतीने कापून तुकडे तुकडे केले. भाई दयाळला उकळत्या तेलाच्या कढईत टाकले, तरीही ते विचलित झाले नाहीत. या दोन शिष्य़ांना मारून गुरु तेग बहादुरजी यांना घाबरवण्याचा प्रयत्न करण्यात आला पण ते घाबरले नाही. यानंतर दिल्लीच्या चांदनी चौकात गुरु तेग बहादुरजी यांचे शीश कापण्याचा हुकूम दिला आणि २४ नोव्हेंबर, १६७५ रोजी धर्माच्या रक्षणासाठी बलिदान दिले. तेगबहादुरांचे बलिदानस्थान आज ‘सीसगंज गुरुद्वारा’ म्हणून प्रसिद्ध असून पवित्र मानले जाते.
धरम हेत साका जिनि कीआ
सीस दीआ पर सिरड न दीआ|
धर्मरक्षणासाठी, शीलासाठी आपले शिर तोडून देऊ, पण धर्म भ्रष्ट होऊ देणार नाही, असाच काहीसा या काव्याचा अर्थ आहे.
तेगबहादुरांचे शिर एका माणसाने पळवून आनंदपूरला आणले. गुरु तेगबहादुर यांच्या या अपूर्व बलीदानाची स्मृती म्हणून दिल्लीच्या चांदणी चौकातील ‘गुरुद्वारा शीशगंज’ आजही आपल्याला संदेश देतो, ‘जो देहापेक्षा धर्म अधिक मौल्यवान समजतो, त्याचे यश अविनाशी आणि शाश्वत होते.’ तेगबहादुरांचे हे बलीदान युगानुयुगे धर्मप्रेमींना प्रेरणा देत राहील.
तेगबहादुरांच्या ह्या बलिदानाने सर्व पंजाब पेटून उठला. आततायी मोघल शासकांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्याचे दमन करु पाहणार्या नितीविरुद्ध गुरु तेगबहादुरजी यांचे बलिदान ही एक अभूतपूर्व ऐतिहासिक घटना होती. स्वधर्म व स्वाभिमान यांच्या रक्षणार्थ हजारो शीख वीर पुढे आले. ह्या घटनेला उद्देशून गुरु तेगबहादूरांचे चिरंजीव आणि शीख धर्माचे संवर्धक गुरु गोविंदसिंह यांनी ‘सीस दिया पर सिर्र न दिया’ असे उद्गार काढले. त्यांच्या बलिदानाने शीख धर्मात जी अस्मिता निर्माण झाली तिला इतिहासात तोड नाही.