Xtreme News India 26-10-2024 00:17:05 6785594
ऐन निवडणुकीच्या काळात पुण्यात पोलिसांनी पकडलं चक्क १३८ कोटींचं सोनं, राज्यात खळबळ पुणे (क्राईम रिपोर्टर) - पुण्यात सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत तब्बल १३८ कोटींचे सोने पकडले गेले आहे. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. सातारा रस्त्यावर आज सकाळच्या सुमारास नाकाबंदी पोलिसांनी कोट्यवधीचे सोने जप्त केलं आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये पैसे आणि गैरव्यवहार होऊ नये यासाठी मोठे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. त्यामुळे आजची पुणे पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात जागोजागी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हे १३८ कोटी रुपये किंमत असलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. एका संशयित वाहनाची पोलिसांनी झडती घेतली असता त्यात हे सर्व सोन्याचे दागिने सापडले. हे सोनं नेमकं आलं कुठून? कुठे जात होतं? कोणाचं होतं? याचा तपास आता पोलीस करत आहेत. दरम्यान, तीन पुण्यातील खेड-शिवापूर शिवारात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर रोख रक्कम घेऊन जाणारे इनोव्हा क्रिस्टा कारला राजगड पोलिसांनी काल सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतले. या वाहनात पैशांची मोठी रक्कम होती. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत पैसे मोजण्याचं काम करत होते, अशी माहिती मिळाली आहे. अंदाजे ५ कोटीच्या आसपास रोख रक्कम होती. पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहे. ही वाहन कुठून आली होती याची माहिती नाही. पण वाहन सांगोला मतदारसंघात जात होती. MH 25 AS 2526 इनोव्हा क्रिस्टा ही कार अमोल शहाजीराव नलवडे या व्यक्तीची असल्याचं माहिती मिळाली आहे.
rled1n
gn27u0
eq86ah
dh3lc5
mar21e
aiomkb