Xtreme News India 07-02-2024 16:08:50 53732
पुणे धनगर समाजाकडून 'सकल धनगर समाज मेळाव्या'चे आयोजन - सुनील देवधर पुणे (प्रतिनिधी) - सर्व धनगर समाज बांधवांना केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती मिळावी, यासाठी पुणे धनगर समाजाकडून 'सकल धनगर समाज मेळाव्या'चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ११ फेब्रुवारी २०२४ आयोजित हा मेळावा शुभारंभ मंगल कार्यालय, म्हात्रे पुलाजवळझ डीपी रोड एरंडवणे येथे सायं. ४ वाजता होणार आहे. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून महा ॲग्रीएफपीओचे व्यवस्थापकीय संचालक ऍड. विजय गोफणे व प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते सुनीलजी देवधर उपस्थित राहणार आहेत. याच बरोबर धनगर समाजाच्या विविध संघटनांच्या प्रमुखांचा सत्कार देखील यावेळी करण्यात येणार आहे. या मेळाव्यास धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती करून घ्यावी असे आवाहन सुनील देवधर यांनी केले आहे.
chymv0