राम मंदिर राष्ट्रार्पणानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य ‘रथयात्रा’; आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार
Xtreme News India
20-01-2024 17:25:15
54918
राम मंदिर राष्ट्रार्पणानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य ‘रथयात्रा’; आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार
दि.२१ जानेवारी रोजी भक्ती-शक्ती चौक येथून प्रस्थान
पुणे (प्रतिनिधी) - राम जन्मभूमी अयोध्येतील श्रीराम मंदिर राष्ट्रार्पण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य ‘रथयात्रा’ आयोजित केली आहे, अशी माहिती भाजपाचे प्रखर हिंदूत्ववादी आमदार महेश लांडगे यांनी दिली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. २२ जानेवारी २०२४ रोजी राम जन्मभूमी अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचे राष्ट्रार्पण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी देशभरामध्ये उत्सवाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.पिंपरी-चिंचवडमध्येसुद्धा राम मंदिर आणि श्रींच्या आगमनाचा उत्सव दिमाखदार होणार असून, रविवारी, दि. २१ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३ वाजता ‘रथयात्रा’ काढण्यात येणार आहे. शहरातील भक्ती-शक्ती चौक येथील यात्रेला सुरूवात होईल आणि रामायण मैदान चिखली येथे समोरोप होणार आहे.
रथयात्रेमध्ये तब्बल हजारो दुचाकी व चारचाकी, चार विजयरथ, राम मंदिर प्रतिकृती, मर्दानी खेळ, डी.जे. ढोल पथक, झांज पथक, श्रीराम जिवंत देखावा, गंगा आरती, सनई चौघडे, महाबली हनुमान, कलश यात्रा, आतिषबाजी यासह हिंदू धर्माबाबत जागृती करण्यासाठी विविध देखावे असणार आहेत. विशेष म्हणजे, महिलांची बुलेट रॅलीसुद्धा होणार आहे.
Contact For News & Advertisement.