Editor: Mr. Shrikrishna Aayacit, Executive Editor: Mr. Sanjaykumar Joshi
 Top Advertisement's

 Pimpri chinchwad

खासदार श्रीरंग बारणे यांची मोरया गोसावी मंदिरात स्वच्छता मोहीम

Xtreme News India   20-01-2024 16:34:35   46024

खासदार श्रीरंग बारणे यांची मोरया गोसावी मंदिरात स्वच्छता मोहीम

 पंतप्रधानांच्या आवाहानाला प्रतिसाद देत मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (शनिवारी) चिंचवड येथील श्रीमान महासाधू मोरया गोसावी मंदिरात स्वच्छता मोहिम राबविली. मंदिर परिसर स्वच्छ धुवून काढला.

पुणे (प्रतिनिधी) - आमदार उमा खापरे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र देव, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, नारायण लांडगे या मोहिमेत सहभागी झाले होते. अयोध्येमध्ये २२ जानेवारीला राम मंदिराचे उद्‌घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीतील सर्व मंदिरांची सफाई करून मंदिराना विद्युत रोषणाई केली जाणार आहे. मंदिरे विद्युत रोषणाईने झळाळणार आहेत.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिर राष्ट्रार्पण व श्रींची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ रोजी होत आहे. हा दिवस भारतीयांसाठी गौरवाचा आणि उत्सवाचा आहे. संपूर्ण देशात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. प्रभू श्रीराम मंदिरामध्ये अवतरणार असल्याच्या क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्याला लाभणार आहे. सोमवारी सर्वांनी दिवाळी साजरी करावी.


Contact For News & Advertisement.


 People's Feedback


Xtreme News India
gEUPdMkcS 04-12-2024 20:54:57

Xtreme News India
OjfMewxFzCeoJf 09-11-2024 10:37:11

Xtreme News India
iDqFyESUMKbvL 22-12-2024 15:49:12

Xtreme News India
OElObtdGLLQKK 31-12-2024 15:14:01

Xtreme News India
wBDeLQAcYOff 26-01-2025 10:39:18

Xtreme News India
FoFMAIkJD 30-03-2025 11:35:25


 Your Feedback



 Advertisement