Xtreme News India 20-01-2024 15:42:12 35624
नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये 55 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक; कोणत्या धरणात किती पाणी? जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या केवळ 55 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 27 टक्क्यांनी पाणीसाठा कमी आहे. नाशिक (प्रतीनिधी) - जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या केवळ 55 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 27 टक्क्यांनी पाणीसाठा कमी आहे. मागील वर्षी 18 जानेवारीला 53 हजार 843 दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा 36 हजार 322 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. म्हणजेच गतवर्षीपेक्षा 29 हजार 342 दशलक्ष घनफूट पाणी कमी आहे. यंदा 27 टक्क्यांनी पाणीसाठा कमी असल्याने पुढील सात महिन्यांची भिस्त याच पाणीसाठ्यावर अवलंबून आहे. जिल्ह्यात मध्यम आणि मोठ्या आकाराची मिळून एकूण 24 धरणे आहेत. या धरणांची पाणी साठवण क्षमता 65 हजार 664 दशलक्ष घनफूट इतकी आहे. गंगापूर धरणात 67 टक्के जलसाठानाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात गतवर्षी 83 टक्के उपयुक्त जलसाठा होता. यंदा 67 टक्के पाणी उपलब्ध आहे. तर करंजवण धरणात गतवर्षीच्या तुलनेत 30 टक्के पाणी कमी आहे. ओझरखेडमध्ये 39 टक्के, वाघाडमध्ये 34 टक्के, तिसगावमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत 44 टक्के तर माणिकपुंजमध्ये 45 टक्के उपयुक्त जलसाठा कमी आहे. दारणा धरणात 53 टक्के जलसाठाआळंदी धरणात मागील वर्षी 77 टक्के जलसाठा होता तो आता 67 टक्के इतका आहे. पालखेड धरणात 2023 साली 71 टक्के साठा होता तो यंदा 62 टक्के झाला आहे. दारणा धरणात 18 जानेवारी 2023 साली 74 टक्के जलसाठा होता. यंदा तो साठा 53 टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. मुकणे, गिरणा, नांदूरमध्यमेश्वरचा जलसाठा पुढीलप्रमाणेमुकणे धरणात मागील वर्षी 88 टक्के जलसाठा होता तो आता 57 टक्के झाला आहे. नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यात 2023 साली 97 टक्के जलसाठा होता. यंदा हा साठा 95 टक्क्यांवर आहे. गिरणा धरणात मागील वर्षी एकूण 79 टक्के जलसाठा होता तो आता 42 टक्क्यांवर आला आहे. भोजापूर धरणात मागील 2023 साली 81 टक्के साठा होता तो आता 20 टक्केच शिल्लक आहे.