Xtreme News India 20-01-2024 14:24:32 24714
‘पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टी मुक्त होणार’; बांधकाम मजुरांसाठी घरे बांधण्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची गाव्ही पिंपरी-चिंचवड शहर लवकरच झोपडपट्टी मुक्त करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. पिंपरी-चिंचवड (प्रतीनिधी) - अजित पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराचा विकास होत आहे. या शहरात मराठवाडा, विदर्भ, खान्देशातून जास्त प्रमाणात मजूर आणि कामगार काम शोधण्यासाठी येतात. त्यांना राहण्यासाठी घर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिका आणि राज्य शासनाची आहे. त्यांच्यासाठी महापालिकेकडून पिंपरी आणि आकुर्डी येथे गृहप्रकल्प उभारले आहेत. शहरातील प्रत्येकाला चांगले आणि हक्काचे घर देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. सोलापूरला कामगारांसाठी ३६० एकरमध्ये ३० घरांचा गृहप्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्या पार्श्वभुमीवर पिंपरी-चिंचवड शहरात बांधकाम मजुरासाठी घरे बांधण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. यावेळी आयुक्त शेखर सिंह, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे खासदार श्रीरंग बारणे, आमदार अण्णा बनसोडे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, नाना काटे आदी उपस्थित होते. त्यावेळी अजित पवार बोलत होते.