मनोज जरांगेंनी शेवटचा डाव टाकत सरकारला धरलं वेठीस, मुंबईला निघण्यापूर्वी केली ही घोषणा
मराठ्यांची एकजूट सोडू नका माझं काहीही झालं तरीही चालेल असंही मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे प्रवास सुरु केला आहे.
जालना (प्रतिनिधी) - मराठा आरक्षणावरुन पुन्हा एकदा वातावरण तापणार आहे अशी चिन्ह दिसत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे हे त्यांच्या समर्थकांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यापूर्वी त्यांनी सरकाला वेठीस धरण्यासाठी मोठी घोषणा केली. मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे मुंबईत आंदोलन करणार आहेत. मुंबईला निघण्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी सरकारला वेठीस धरताना त्यांनी आंतरवाली सराटीमधूनच आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या निर्णयामुळे सरकारच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.
एकीकडे रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आणि दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेसोबत मराठे मुंबईत आंदोलन करणार असल्याने एकनाथ शिंदे सरकारच्या अडचणीत भर पडली आहे. त्यात मनोज जरांगे यांनी सरकारविरोधात टीका केली आहे. 54 लाख नोंदी आणि 45 वर्षांपासून लढा सुरु आहे. तरी सरकार इतकं निर्दयीपणे कसं वागू शकतं. ज्या सरकारला मराठ्यांनी गादीवर बसवलं. आज नोंदी मिळालेल्या असताना आरक्षण देऊ शकत नाही? गोरगरीबांची पोरं मरत असताना त्यांना हक्काचं आरक्षण का देत नाही? हा अन्यायाचा कळस झाला आहे. डोळ्यांदेखत आत्महत्या होत आहेत तरीही सरकारला झोप कशी लागते? या शब्दात त्यांनी सरकारवर प्रहार केला आहे.
मुंबईत मनोज जरांगे आंदोलन करुन नयेत यासाठी सरकारकडून अनेक वेळा प्रयत्न करण्यात आले. अनेकदा सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आणि मला समजवण्याचा प्रयत्न झाला. बच्च कडूदेखील सरकारकडून जरांगेकडे समजूत काढण्यासाठी गेले होते. मात्र मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे ठाम असून जीव गेला तरी मागे फिरणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे.