Editor: Mr. Shrikrishna Aayacit, Executive Editor: Mr. Sanjaykumar Joshi
 Top Advertisement's

 Pune Rural

इंद्रायणी जलप्रदूषण मुक्तीसाठीचे बेमुदत उपोषण पाचव्या दिवशी सुरूच

Xtreme News India   19-01-2024 17:56:55   57316

इंद्रायणी जलप्रदूषण मुक्तीसाठीचे बेमुदत उपोषण पाचव्या दिवशी सुरूच

आळंदी (Alandi) येथे राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडी महाराष्ट्र यांच्या वतीने दि.15 पासून इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठीचे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा पाचवा दिवस सुरू आहे.

 

पुणे (प्रतिनिधी) - महाद्वार चौकात हभप मोहनानंद महाराज ओवाळ, हभप मुबारक शेख, फारूक इनामदार, हभप दत्तात्रय साबळे यांचे हे बेमुदत उपोषण चालू आहे. राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडी महाराष्ट्र यांच्या उपोषणकर्त्यांनी यावेळी सांगितले, की महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी लाक्षणिक उपोषण सुरू होतील.

उपोषणस्थळी आज जगन्नाथ बापू शेवाळे यांनी सदिच्छा भेट (Alandi) देत या उपोषणास पाठिंबा दिला आहे. तसेच बबनराव कुऱ्हाडे माजी नगराध्यक्ष, नंदकुमार कुऱ्हाडे, अनिल महाराज तापकीर, रंगनाथ बोराटे, भाऊसाहेब कोळेकर, गणपतराव कुऱ्हाडे, सतीश कुऱ्हाडे, आनंदराव मुंगसे, मंगेश तिताडे व आळंदी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील मान्यवर यांनी उपोषणस्थळी जाऊन इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी उपोषणास पाठींबा दिला.


Contact For News & Advertisement.


 Your Feedback



 Advertisement