Editor: Mr. Shrikrishna Aayacit, Executive Editor: Mr. Sanjaykumar Joshi
 Top Advertisement's

 Solapur

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे…”,भर सभेत मोदींच्या समोरच नरसय्या आडम यांनी केला उल्लेख

Xtreme News India   19-01-2024 14:39:48   88690

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे…”,भर सभेत मोदींच्या समोरच नरसय्या आडम यांनी केला उल्लेख

पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवड्याभराच्या अंतराने पुन्हा एकदा महाराष्ट्रात विविध उद्घाटनासाठी सोलापूरात दाखल झाले होते. रे नगर या श्रमिक वसाहतीच्या ३० हजार घरांपैकी १५ हजार सदनिकांचे वाटप करण्यात आले.

सोलापूर (प्रतिनिधि) - ज्यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प उभा राहिला, त्या नरसय्या आडम यांनी भाषणात केलेल्या एका उल्लेखामुळे खुद्द मोदींसह एकनाथ शिंदे व इतर मान्यवरांना आश्चर्याचा धक्काच बसला. नरसय्या आडम यांनी भाषणादरम्यान, एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री तर उद्धव ठाकरे यांचा उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला.

सोलापूरमध्ये या उपक्रमाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्याबरोबर महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवरही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी आमदार व माकपचे माजी राज्य सचिव नरसय्या आडम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. २०१९ साली ३० हजार असंघटित कामगारांसाठी घरकुल योजनेचं भूमीपूजन मोदींच्या हस्ते करण्यात आलं होतं. ही संकल्पना नरसय्या आडम यांनी मांडली होती. त्यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प साकारला असताना त्यांनी आपल्या भाषणात या प्रकल्पाबाबत भूमिका मांडली.

आडम यांनी भाषणाची सुरुवात “पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारत सरकार, राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे; असा उल्लेख करताच उपस्थितांमध्ये सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. मात्र, झालेली चूक लागलीच लक्षात आल्यानंतर आडम यांनी यावर दिलगिरी व्यक्त करत चूक दुरुस्तही केली. “माफ करा.. देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे नेहमी येतात त्यामुळे तेच नाव माझ्या तोंडात बसलंय. मी माफी मागतो. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, इतर मान्यवर, अधिकारी वर्ग, उपस्थित लोकांनो…”, असं म्हणत त्यांनी भाषणाला पुढे सुरुवात केली.


Contact For News & Advertisement.


 Your Feedback



 Advertisement