आदित्य ठाकरे यांची रविवारी पिंपरीत जाहीर सभा
Xtreme News India
19-01-2024 12:53:15
44696
आदित्य ठाकरे यांची रविवारी पिंपरीत जाहीर सभा
आदित्य ठाकरे यांची रविवारी (दि.21) पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे दुपारी साडेबारा वाजता भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे (प्रतिनिधी)- गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राज्य संघटक एकनाथ पवार, मावळ लाेकसभा मतदार संघाचे संघटक संजाेग वाघेरे पाटील, पुणे जिल्हाप्रमुख ॲड. गाैतम चाबुकस्वार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शहर संघटक संतोष वाळके, जिल्हा उपसंघटिका वैशाली मराठे, युवा सेना अधिकारी चेतन पवार, माजी नगरसेवक मीनल यादव, रेखा दर्शीले, धनंजय आल्हाट, अमित गावडे तसेच निलेश मुटके, तुषार नवले, अनंत कोऱ्हाळे, रोमी संधू, हाजी मणियार दस्तगीर, अनिताताई तुतारे, डॉ. वैशाली कुलथे, कल्पना शेटे, तुषार नवले, मंगलताई भोकरे, वैभवी ताई घोडके, कामिनी मिश्रा, अमोल निकम, नेताजी काशिद आदी पदाधिकारी उपस्थित हाेते.
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे(Pimpri) भक्ती शक्ती चौकात पिंपरी चिंचवड शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात येईल, या नंतर युवा सेनेच्या हजारो कार्यकर्त्यांबरोबर आदित्य ठाकरे दुचाकी रॅली मध्ये सहभागी होणार आहेत. या रॅलीचे स्वागत निगडी, आकुर्डी, चिंचवड स्टेशन आणि मोरवाडी चौक चौकात होईल.
या नंतर दुपारी 12.30 वाजता मुख्य सभेचे ठिकाण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आदित्य ठाकरे मार्गदर्शन करतील. यावेळी ठाकरे यांच्याबराेबर पुणे जिल्हा संपर्क प्रमुख तथा आमदार सचिन अहिर, युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई उपस्थित असणार आहेत.
Contact For News & Advertisement.