Xtreme News India 18-01-2024 16:39:45 88692
बदलापूर खरवई एमआयडीसीमधील कंपनीमध्ये भीषण स्फोट, 5 कामगार गंभीर जखमी एमआयडीसीतील व्ही.के केमिकल या कंपनीला पहाटे चार वाजून 45 मिनिटांच्या सुमारास भीषण आग लागली मुंबई (प्रतिनिधी) - या आगीमुळे कंपनीमध्ये चार ते पाच मोठे स्फोट झाल्याचंही समोर आलं. बदलापूर खरवई एमआयडीसी मध्ये गुरुवारी पहाटे मोठी दुर्घटना घडली आहे. या एमआयडीसीतील व्ही.के केमिकल या कंपनीला पहाटे चार वाजून 45 मिनिटांच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमुळे कंपनीमध्ये चार ते पाच मोठे स्फोट झाल्याचंही समोर आलं. या ठिकाणी झालेल्या स्फोटाचे हादरे 4 ते 5 किलोमीटर लांब जाणवले असल्याचंही समोर आलं आहे. या स्फोटात चार ते पाच कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कंपनीच्या बाहेर दोन टेम्पो उभे होते. यावेळी या टेम्पो मधील केमिकल मध्ये प्रथम आग लागली. त्यानंतर ही आग कंपनीमध्ये पसरली. या आगीबाबत माहिती मिळताच बदलापूर, अंबरनाथ आनंद नगर एम आय डी सी मधील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून आता ही आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आलं आहे.