Editor: Mr. Shrikrishna Aayacit, Executive Editor: Mr. Sanjaykumar Joshi
 Top Advertisement's

 Raigad

रायगडमध्ये पर्यटकांची बस उलटल्याने 2 ठार, 55 प्रवासी जखमी

Xtreme News India   30-12-2023 14:16:48   97982

रायगडमध्ये पर्यटकांची बस उलटल्याने 2 ठार,

55 प्रवासी जखमी

 

रायगड दि. ३० (प्रतिनिधी) - रायगडमध्ये एक भीषण अपघात  घडल्याची बातमी समोर येत असून, पुण्याहून शाळेची सहल कोकणात येत असताना बसचा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महाड, माणगाव इथून बचाव पथके, रुग्णवाहीका घटना स्थळाकडे रवाना झाले आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,या  भीषण अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या, तर ५५ प्रवासी जखमी झाले.

    रायगडमधील माणगाव ते पुणे दरम्यानच्या ताम्हीणी घाटात एक खासगी बस उलटल्याने भीषण अपघात झाल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे. पुण्याहून शाळेची सहल कोकणात जात असताना ताम्हीणी घाटात या बसचा अपघात होऊन बस उलटली. ताम्हिणी घाटात अवघड वळणावर बस चालकाचा नियंत्रण सुटल्याने बस उलटली असल्याचे बोलले जात आहे. अपघातात बसमधील अनेक प्रवासी अडकले होते. दरम्यान, कोंडेघर गाव हद्दीत हा अपघात झाला होता आणि अपघाताची माहिती मिळताच गावकरी मदतीला धावून आले. नागरिकांनी बसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना बाहेर काढले. ज्यात दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. तर, 55 जखमी आहेत. 

    पुणे-माणगाव मार्गावर ताम्हिणी घाटात खाजगी बसला झालेल्या अपघातात 2 महिला प्रवासी ठार झाल्या, तर 55 प्रवासी जखमी झाले आहेत. ही बस पुण्याहून हरीहरेश्र्वर येथे पर्यटकांना घेवून येत असताना सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोंडेघर गावाजवळ अवघड वळणावर उलटली. जखमी प्रवाशांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे.

    रायगडच्या ताम्हिणी घाटात शाळेची बस उलटल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. दरम्यान, बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी असल्याने अपघतानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. तर, जखमींची संख्या अधिक असल्याने तात्काळ याची माहिती परिसरातील आरोग्य प्रशासनाला देण्यात आली. विशेष म्हणजे 55 जण जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिकाची गरज असल्याने, महाड, माणगाव इथून बचाव पथके, आणि रुग्णवाहीका बोलवण्यात आल्या. त्यानंतर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. 

    रायगडच्या ताम्हिणी घाटात शाळेची बस उलटल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी पोलिसांनी जखमींना मदत करत त्यांना रुग्णालयात हलवले. तसेच या अपघतानंतर काही प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाल्याचे चित्र होते. पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवत पुन्हा वाहतूक सुरळीत केली. तसेच, पोलिसांकडून घटनेचा पंचनाम करण्याचे सुरु होते. तर, पोलिसांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील रुग्णालयात पोहचले आहे. 


Contact For News & Advertisement.


 People's Feedback


Xtreme News India
QetLQpePITuPXvJ 31-12-2024 15:14:07

Xtreme News India
FcIFQTJempi 24-02-2025 07:42:29

Xtreme News India
ZBpdyBUhUhXqJ 01-04-2025 13:23:44

Xtreme News India
TKOpbWeIPuiStW 18-04-2025 08:41:12

Xtreme News India
HOjzWpUIEaAoV 22-04-2025 09:20:45

Xtreme News India
TaTTDKXu 03-05-2025 07:29:54

Xtreme News India
DHVrXbafKk 03-05-2025 16:30:54

Xtreme News India
ypJTulImyrUF 03-05-2025 23:03:43

Xtreme News India
gTwFmYBFyd 07-05-2025 16:51:47

Xtreme News India
vRPQWkhcXwwKOx 09-05-2025 17:18:12

Xtreme News India
CymysQCPf 17-05-2025 18:55:32

Xtreme News India
fnvIxDIbRqdr 13-04-2025 00:34:03

Xtreme News India
slhVtoOAUTSq 24-05-2025 06:47:13

Xtreme News India
XeHYyCEB 26-05-2025 03:56:03

Xtreme News India
jZDWPEsUw 28-05-2025 15:30:38

Xtreme News India
hmbHycvGAvEUbu 19-04-2025 18:46:02

Xtreme News India
FOBZsEUIFqdu 02-06-2025 15:00:49

Xtreme News India
pbvGDKrk 03-06-2025 16:37:12

Xtreme News India
hMBTNZwqtH 12-06-2025 21:29:24

Xtreme News India
WFyfxneMIQ 15-06-2025 05:33:09

Xtreme News India
xcpuHmYKtvYCNXD 15-06-2025 19:38:59

Xtreme News India
stZYPJcVZGg 15-06-2025 20:25:28

Xtreme News India
rXnnWcLcr 05-05-2025 06:48:16

Xtreme News India
HtwkYyOxOUV 07-05-2025 13:37:52

Xtreme News India
mpCYhwSbPx 18-06-2025 22:58:44

Xtreme News India
peouxkOxsk 19-06-2025 18:11:58

Xtreme News India
CIDmFkZdXqBGjIV 19-06-2025 19:55:51

Xtreme News India
gUPbpTLLg 20-06-2025 00:42:31

Xtreme News India
MXwzskCCrurqB 21-06-2025 00:00:50

Xtreme News India
LdbkTWqVTo 11-05-2025 21:24:23

Xtreme News India
WblArUUqTl 22-06-2025 13:25:05

Xtreme News India
xVBulbnBTc 19-05-2025 08:36:55

Xtreme News India
FNoWqyxPdXnf 26-06-2025 23:00:22

Xtreme News India
zZZbvWKUJgGO 29-06-2025 20:12:28

Xtreme News India
jhiURZRWA 07-07-2025 00:31:20

Xtreme News India
JNCFUshhqmxfo 07-07-2025 10:25:31

Xtreme News India
WngpSBVxpzd 20-06-2025 08:51:47


 Your Feedback



 Advertisement