Editor: Mr. Shrikrishna Aayacit, Executive Editor: Mr. Sanjaykumar Joshi
 Top Advertisement's

 Satara

नववर्षासाठी सजल पांचगणी, महाबळेश्वर; बाजारपेठाही विद्युत रोषणाईने सजल्या

Xtreme News India   30-12-2023 13:54:20   92741

नववर्षासाठी सजल पांचगणी, महाबळेश्वर;

बाजारपेठाही विद्युत रोषणाईने सजल्या

 

सातारा दि. ३० (प्रतिनिधी) - मिनी काश्मीर म्हणून ओळख असणारं गिरिस्थळ महाबळेश्वर पाचगणी नववर्षांच्या स्वागतासाठी पर्यटकांनी बहरलं आहे. या ठिकाणच्या बाजारपेठाही विद्युत रोषणाईने सजल्या आहेत. नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. नववर्षांच्या स्वागतासाठी अनेक जण विविध ठिकाणी फिरायला जात असतात. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जाणार महाबळेश्वर पाचगणी पर्यटकांनी बहरलं आहे. नववर्षांच्या स्वागतासाठी बाजारपेठा विद्युत रोषणाईने सजल्या आहेत. तसेच नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णा लेक परिसरात जत्रेचं स्वरूप आलेले पाहायला मिळत आहे. या बरोबर खाद्य पदार्थाचा आस्वाद घेत धमाल मस्ती केली जात आहे. विविध पॉईंट्स बाजूने च्या टेबल लँड वर ही गर्दी आहे. ऐन थंडीतही पर्यटक आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी ज्यूस, क्रीम, आईस गोळ्यांच्या गाड्यांवर गर्दी करत आहेत.

     महाबळेश्वरला पर्याय म्हणून आता पर्यटक तापोळा पाचगणी पर्याय म्हणून पहात आहेत. येथील बाजारपेठ पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली असून येथील प्रसिद्ध वस्तू आणि पदार्थांच्या खरेदीसाठी पर्यटक गर्दी करत आहेत. येथील प्रसिद्ध चणे, जाम ,जेली, चिक्की, चटकदार स्ट्रॉबेरी खरेदीसाठी ही गर्दी होताना दिसत आहे. खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत पर्यटक धम्माल मस्ती करत आहेत.महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असून सध्या सहलीही मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. हॉटेल्स, लॉजसाठी पर्यटक विविध साइट्‌सच्या माध्यमातून ‘ऑनलाइन बुकिंग’ चा वापर करताना दिसत आहेत.

    नववर्षानिमित्त हॉटेल्स मध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. जास्तीत जास्त पर्यटक आपल्याकडे यावे त्यासाठी इमारतीला रंगरंगोटी विद्युत रोषणाई व जेवणासाठी विविध पदार्थांची रेलचेल करण्यात आली आहे. विविध चवदार पदार्थ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महाबळेश्वर पाचगणी परिसर गर्दीने फुलून गेला आहे. गिरिस्थानांवर वाढलेली गजबज या शहरांच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत आहेत

    नववर्षाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. महाबळेश्वरच्या वनविभागाच्या हद्दीत वन्य प्राण्यांना त्रास होऊ नये याकडे या विभागाने कटाक्षाने लक्ष दिले आहे. खासगी बंगले, हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये रात्री कोणतीही पार्टी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना, फटाके फोडण्यास, धूम्रपान करण्यास, मादक पदार्थाचे सेवन करण्यास,मद्य पिऊन गाडी चालविण्यास बंदी घालण्यात आली आहे.

 


Contact For News & Advertisement.


 People's Feedback


Xtreme News India
XMNKAqoQZBlIFR 04-12-2024 20:55:08

Xtreme News India
UNeaHVOyFOeNlgg 08-12-2024 17:42:13


 Your Feedback



 Advertisement