Editor: Mr. Shrikrishna Aayacit, Executive Editor: Mr. Sanjaykumar Joshi
 Top Advertisement's

 Buldhana

नववर्षानिमित्त श्री संत गजानन महाराजांच्या मंदिराच्या वेळेत मोठा बदल

Xtreme News India   29-12-2023 16:05:46   96282

  नववर्षानिमित्त श्री संत गजानन महाराजांच्या

मंदिराच्या वेळेत मोठा बदल 

 

बुलढाणा दि. २९ (प्रतिनिधी) - नवीन वर्षाच्या स्वागता निमित्त शेगावात श्रींच्या दर्शनासाठी होणारी  गर्दी लक्षात घेता, श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे मंदिर ३१ डिसेंबर रोजी दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवणार येणार आहे, अशी माहिती श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.दरवर्षी चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या निमित्ताने श्रींच्या दर्शनासाठी शेगावात मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. भाविकांना श्रींच्या समाधी दर्शनाचा लाभ मिळावा व होणाऱ्या गर्दीचे नियोजन योग्य रितीने व्हावे, या उद्देशाने ३१ डिसेंबर रोजी श्रींचे समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे.

     त्यामुळे रात्री येणाऱ्या भाविकांना पहाटे श्रींचे दर्शन, महाप्रसाद घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करता येणार आहे. श्रींच्या भाविकांसाठी संस्थानाच्या वतीने दर्शन बारी व श्रीमुख दर्शन बारी, महाप्रसाद पारायण मंडप, श्रींची गादी तसेच औदुंबर दर्शनाची व्यवस्था केली आहे. तसेच भक्तांच्या सोयीसाठी संस्थानाच्या भक्त निवासामध्ये नियमांनुसार अल्प दरात राहण्याची व्यवस्था नित्यप्रमाणे सुरू आहे.

    भक्तांची श्रींच्या प्रती आपली आस्था प्रसन्न मनाने एकरूप करणारी आहे. भक्तांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी श्रींचे सेवेकरी आपली सेवा देण्यास तत्पर आहेत.दरवर्षी देशभरातील लाखो भाविक सरत्या वर्षाला निरोप देत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन नवीन वर्षाला सुरुवात करत असतात. त्यामुळे ३१ डिसेंबर रोजी लाखोच्या संख्येने भाविक शेगाव येथे दाखल होतात. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.


Contact For News & Advertisement.


 Your Feedback



 Advertisement