Xtreme News India 26-12-2023 13:18:29 85599
कोल्हापुरात झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वाराचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी कोल्हापूर,२६ डिसेंबर (UNI) - शहरातील ताराराणी चौक-श्री शाहू मार्केट यार्ड रस्त्यावर सोमवारी मोटारसायकल आणि मोपेडची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील बोजुर्डी येथील सुनील सूर्यकांत पाटील असे मृताचे नाव असून, ते मोटारसायकलवरून शहरात येत असताना वैद्यकीय उपचारासाठी शहराकडे निघालेल्या मोपेडने मोपेडस्वार शाम हसमुख उकाराणी (गांधीनगर) यांना धडक दिली.या घटनेचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.