अहमदनगर जिल्ह्यातील भानगाव नळ पाणीपुरवठा
योजनेचे काम प्रगतीपथावर– मंत्री गुलाबराव पाटील
नागपूर दि.१६ (प्रतिनिधी) - जल जीवन मिशन अंतर्गत भानगाव (ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) येथील नळ पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीत असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधान परिषदेत दिली.भानगाव (ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) येथील नळ पाणीपुरवठा योजनेचे काम प्रलंबित असल्याबाबतचा प्रश्न सदस्य प्रा.राम शिंदे यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते.
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जलजीवन मिशन अंतर्गत भानगाव योजनेचे उर्ध्व वाहिनीचे व वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण असून उंच टाकीचे पहिल्या टप्प्यापर्यंत काम पूर्ण झालेले आहे. योजनेचे काम प्रगतीत आहे. सद्यःस्थितीत भानगाव गावठाण व तीन वाड्या वस्त्यांना अस्तित्वातील योजनेव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे.