Editor: Mr. Shrikrishna Aayacit, Executive Editor: Mr. Sanjaykumar Joshi
 Top Advertisement's

 Satara

पुणे-बंगळुरू महामार्गावर भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला धडक, दोघांचा जागीच मृत्यू

Xtreme News India   12-12-2023 16:25:45   86618

पुणे-बंगळुरू महामार्गावर भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला धडक,

दोघांचा जागीच मृत्यू

 

सातारा दि. १२ (प्रतिनिधी) -  पुणे-बंगळुरू महामार्गावर सोमवारी रात्रीच्या सुमारास ट्रक आणि ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या महिलेसह एका पुरुषाचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रकमधील एक जण जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी  घटनास्थळी धाव घेतली. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातातील मृतांची नावे समजू शकली नाही

    ट्रक भरधाव वेगात पुण्याच्या दिशेने येत होता. या ट्रकने रात्रीच्या सुमारास लिंबेगावजवळ ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये ट्रॅक्टरवर बसलेली महिला आणि पुरुष खाली पडले आणि त्यांच्या अंगावरून ट्रॉलीचे टायर गेले. या घटनेत पुरुषाचा जागीच मृत्यू झाला. महिला जखमी झाल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, पंरतू डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.या अपघातात ट्रकमधील एकजण देखील जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


Contact For News & Advertisement.


 People's Feedback


Xtreme News India
WwLBanXToV 21-12-2024 21:02:41


 Your Feedback



 Advertisement