मराठवाड्याच्या मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द
छत्रपती संभाजीनगर दि.१२ (प्रतिनिधी) - मध्य रेल्वे विभागाच्या मुंबई विभागात मालगाडी रेल्वे रुळावरून घसरल्यामुळे, या रेल्वे मार्गाचे दुरूस्तीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. या अपघातामुळे रेल्वेच्या वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला आहे. या कारणामुळे मराठवाड्याच्या मुंबईकडे जाणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द केल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. रद्द करण्यात आलेल्या तीन रेल्वेमध्ये जालना ते दादर जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस या रेल्वेचाही समावेश आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या -
१२ डिसेंबरला धावणाऱ्या रेल्वे क्रमांक १७६८८ धर्माबाद-मनमाड एक्स्प्रेसची एक फेरी रद्द करण्यात आली आहे.
१२ डिसेंबरला धावणाऱ्या रेल्वे क्रमांक १२०७२ जालना-मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेसची एक फेरी रद्द करण्यात आली आहे.
१२ डिसेंबरला धावणाऱ्या रेल्वे क्रमांक ०१४१३ निजामाबाद-पंढरपूर एक्स्प्रेसची एक फेरी रद्द करण्यात आली आहे.