Editor: Mr. Shrikrishna Aayacit, Executive Editor: Mr. Sanjaykumar Joshi
 Top Advertisement's

 Sindhudurg

सिंधुदुर्ग समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या पुण्याच्या 4 मुलींचा मृत्यू, 1 मुलगा बेपत्ता

Xtreme News India   10-12-2023 11:54:16   96863

सिंधुदुर्ग समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या

पुण्याच्या 4 मुलींचा मृत्यू, 1 मुलगा बेपत्ता

 

सिंधुदुर्ग दि. १० (प्रतिनिधी) -  देवगड समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेले पाचं पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे. यामधील चौघां मुलींचे मृतदेह सापडले असून एक जण बेपत्ता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व पर्यटक पुणे येथील खासगी सैनिक अकॅडमीचे विद्यार्थी आहेत. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीची 35 जणांची सहल देवगड येथे आली होती. समुद्रात आंघोळीसाठी पाच जण उतरले होते. त्यावेळी पाचजण बुडाले आहेत. 

    या घटनेची माहिती मिळण्यास पोलीस घटनास्थळी दाखील झाले. पोलिस स्थानिकांच्या मदतीने समुद्रात शोध मोहीम करण्यात आली. यावेळी सर्व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मृतांमध्ये प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा पडवळ, पायल बनसोडे यांचा समावेश आहे. तर राम डिचोलकर बेपत्ता आहे.  पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीची 35 जणांची सहल आली होती. समुद्र किनाऱ्यावर पोहचल्या नंतर आंघोळ करण्याचा मोह आवरला नाही. त्यामूळे या गृपमधील काही जण समुद्रात आघोळीसाठी गेले. यातील पाच जण समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले.

    या घटनेची माहिती मिळण्यास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्यासह पोलीस सहकारी , तहसीलदार रमेश पवार नगराध्यक्ष साक्षी प्रभू घटना स्थळी दाखल झाले. सध्या स्थानिकांच्या मदतीन शोध मोहीम ही सुरु असून बेपत्ता मुलाचा शोध हा घेतला जात आहे.

 


Contact For News & Advertisement.


 Your Feedback



 Advertisement