Editor: Mr. Shrikrishna Aayacit, Executive Editor: Mr. Sanjaykumar Joshi
 Top Advertisement's

 Raigad

आदर्श पतसंस्था राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

Xtreme News India   07-12-2023 11:15:18   114882

आदर्श पतसंस्था राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित 

 

अलिबाग दि. ७ (प्रतिनिधी) -  सहकारात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अलिबाग येथील आदर्ष नागरी सहकारी पतसंस्थेला राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सहकार भरती तर्फे हा पुरस्कार दिल्लीत देण्यात आला. सहकार भारतीच्या विद्यमाने  पतसंस्थांच्या समस्या केंद्रीय स्तरावर मांडण्यासाठी दिल्ली येथे 2 व 3 डिसेंबर रोजी राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.  या अधिवेशनात  प्रत्येक राज्यातील दोन संस्थांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आले तर  संपूर्ण देशातून तीन पतसंस्थांना   राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलेल्या देशातील तीन पतसंस्थामध्ये  अलिबाग येथील आदर्श नागरी पतसंस्थेची सामावेश आहे. 

      केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवतजी कराड यांचे  हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यावेळी सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष दीनानाथ ठाकूर, महामंत्री डॉ.उदय जोशी उपस्थित होते. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थेचे संस्थापक सुरेश पाटील , संचालक  अनंत म्हात्रे, सतीश प्रधान, जगदीश पाटील, विलाप सरतांडेल, रामभाऊ गोरीवले, भगवान वेटकोळी, संजय राऊत, मकरंद आठवले, सी ओ अजय थळकर यांनी हा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला. 

    आदर्श पतसंस्थेला यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या  सहकार विभागातर्फे 2012 साली सहकार भूषण पुरस्कार देऊन आदर्शला गौरविण्यात आले आहे. 2003 साली आय  ए एस ओ  9001 : 2008 आंतरराष्ट्रीय गुणवंत नामांकन  व 2017 आर्थिक  वार्षिक वर्षात रायगड जिल्ह्यात प्रथम आय ए एस ओ 9001:2015 मानांकन  सहकार भारती सहकार प्रशिक्षण संस्थेतर्फे उल्लेखनीय काम करणारी संस्था म्हणून गौरव. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा मुंबईसह कोकण विभागात प्रथम क्रमांकाचा आदर्श पतसंस्था पुरस्कार. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा 2017 चा दिपस्तंभ प्रथम क्रमांकाचा पुरस्कार. सहकार भारतीच्या सहकार सुगंध मासिकातर्फे उत्कृष्ट पतसंस्था पुरस्कार. नचिकेत प्रकाशन नागपूरतर्फे सर्वोत्तम पतसंस्था पुरस्कार. बँको नाशिक तर्फे  उत्कृष्ट पतसंस्था पुरस्कार 2014 , रायगड जिल्हा पतसंस्था फेडरेशनतर्फे तीन वेळा उत्कृष्ट व्यवस्थापन व अहवाल स्पर्धेनिमित्त गौरव . महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा 2022 द्वितीय क्रमांकाचा दीपस्तंभ पुरस्कार हे पुरस्कार आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेला मिळाले आहेत.


Contact For News & Advertisement.


 Your Feedback



 Advertisement