नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनासाठी
तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा
नागपूर दि. ६ (प्रतिनिधी) - राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होणार आहे.७ डिसेंबरपासून हे अधिवेशन सुरू होणार असून सरकारकडून आवश्यक अशी तयारीही करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात ११ हजार पोलिस तैनात करण्यात आल्याचीही माहिती आहे.राज्यपाल रमेश बैस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अख्खं मंत्रिमंडळ शहरात मुक्कामी राहणार आहे. त्यामुळं संपूर्ण शहरात अकरा हजारावर पोलिस बळ तैनात करण्यात आल आहे.
तर विरोधकही आक्रमक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात चोख पोलीस बंदोबस्त असणार आहे. तर व्हीआयपी सुरक्षा ही पोलीसांची प्राथमिकता असणार असून राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, दंगा नियंत्रण पथक असणार २४ तास तैनात असणार आहे. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर असणार आहे, अशी माहिती नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. आतापर्यंत ४५ पेक्षा जास्त मोर्च्यांना परवानगी दिली असून अधिवेशन काळात जवळपास १०० मोर्चे धडकणार आहे. या मोर्चांवर वॅाच ठेवण्यासाठी सीसीटीव्ही, ड्रोन, मोबाईल सर्व्हीलंस वॅन तैनात असणार आहे.
राज्य राखीव पोलिस दलाच्या सशस्त्र तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री निवास रामगिरी, उपमुख्यमंत्री निवास देवगिरी व विजयगड येथेही सशस्त्र तुकड्या तैनात असतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान असलेल्या देवगिरीसाठी खास वेगळा रस्ताही तयार करण्यात आलाय.सिव्हिल लाइन्स परिसरातील आमदार निवासातही पोलिस अधिवेशनासाठीराज्यभरातून सहा हजार पोलिस नागपुरात आले आहेत. नगापूर शहर पोलिसांना ते मदत करणार आहेत. नागपूर शहर पोलिस दलातील पाच हजार कर्मचाऱ्यांना जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आला.बाहेरील जिल्हयातून पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक दर्जाचे 10 अधिकारी तैनात असतील. 50 पोलिस उपअधीक्षक, सहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाचे अधिकारी त्यांना मदत करतील. 75 पोलिस निरीक्षक, 20 महिला पोलिस निरीक्षकांचाही यात समावेश असेल.