श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्या
अधिकृत वेबसाईटचा अनावरण सोहळा संपन्न
श्री क्षेत्र ओझर, दि. ४ (प्रतिनिधी) - श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्या अधिकृत वेबसाईटचे अनावरण राज्यस्तरीय महाराष्ट्र महासंघाच्या अधिवेशनात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.देवस्थान ट्रस्ट भाविकांसाठी राबवत असलेल्या विविध सुखसोई ,निवास व्यवस्थे विषयी संपूर्ण माहिती ,ऑनलाईन रूम बुकिंग,देणगी,अभिषेक व्यवस्था,हेलिकॉप्टर द्वारे दर्शन सुविधा,बस सेवे द्वारे अष्टविनायदर्शन,गंगाआरती,महाआरती बुकिंग इत्यादी.सुविधा या वेबसाईट द्वारे उपलब्ध होणार असल्याचे देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष गणेश कवडे यांनी सांगितले. याअधिकृत वेबसाईट चे अनावरण महाअभिव्यक्ता सर्वच्य न्यायालय विष्णूशंकरजी जैन, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशीलदादा शेरकर हिंदू जन जागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे , राज्यस्तरीय महाराष्ट्र महासंघाचे मुख्य संघटक सुनील घनवट यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या प्रसंगी देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष गणेश कवडे,मा.सुरेशजी कौदरी अध्यक्ष भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट,मा.जितेंद्रजी बिडवई,अध्यक्ष लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट,दशरथ मांडे सचिव विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट,बी.व्ही.अण्णा मांडे विश्वस्त विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट,आनंदराव मांडे,श्रीराम पंडित, राजश्री कवडे, ओझर गावच्या सरपंच तारामती कर्डक,राजश्री कवडे,तंटामुक्त कमिटी अध्यक्ष दिलीप मार्तंड कवडे, यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ॲड विष्णूशंकरजी जैन म्हणाले श्री क्षेत्र ओझर मध्ये मंदिरात गेल्यानंतर प्रचंड भव्यता तसेच दिव्यतेचा साक्षात्कार होत असल्याचा अनुभव येत असल्याचे सांगितले.सदर च्या वेब साईट मुळे देवस्थान ट्रस्ट भाविकांना पुरवत असलेल्या सुविधांची योग्य माहिती ऑनलाइन मिळणार असून भाविकांना ऑनलाइन भक्तनिवास बुकिंग ,तसेच देणगी , अभिषेक सुविधा देखील उपलब्ध होणार आहे म्हणून ऑनलाईन देणगी ची सुरुवात जैन यांनी रक्कम रुपये ५००१/- ऑनलाईन देणगी देऊन केली.तसेच श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट भाविकांना विविध सुख सुविधा उपलब्ध करून देण्यात नेहमीच अग्रेसर असणारे देवस्थान असल्याचे सत्यशील शेरकर यांनी म्हटले.
तसेच छत्रपती संभाजी नगरमध्ये पत्रकार परिषद होत असताना हिंदू जन जागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांना विचारण्यात आले कि विश्वस्त मंडळ पत्रकारांना मंदिराचा कोणताही हिशोब दाखवत नाही त्या वेळी त्यांनी श्री क्षेत्र ओझर चे अध्यक्ष गणेश कवडे यांनी सुरु केलेल्या दैनंदिन हिशोब डिजिटल बोर्डावर दाखवत असल्याचे अनावरण सोहळ्यात बोलताना सांगितले.
या देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष गणेश कवडे अध्यक्ष म्हणून काम न करता एक कार्यकर्ता म्हणून काम करत असल्याचे भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष सुरेश कौदरे यांनी वेबसाईट अनावरणासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आभार मानताना म्हटले म्हणून श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.श्री क्षेत्र ओझर मध्ये जेव्हा राज्यस्तरीय महाराष्ट्र मंदिर महासंघ अधिवेशन घेण्यात आले त्या वेळी श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट हे सहकार्यात अग्रेसर असताना या ठिकाणी सुरु असलेले विविध उपक्रम भाविकांना प्रसन्नता देत असल्याचे त्यांनी सांगितले.