सातारा येथील वेण्णा लेक आणि टेबल लॅन्डसह
दोन्ही शहरे धुक्यात
सातारा दि. १ (प्रतिनिधी) - पाचगणी, महाबळेश्वर आज ढग उतरल्याचा अनुभव पर्यटकांनी घेतला. थंडीचा कडाका वाढला असून आज पारा घसरला आहे. वेण्णा लेक आणि टेबल लॅन्डसह दोन्ही शहरे धुक्यात हरवली आहेत. आज सकाळ पासून कमी सूर्यप्रकाश, धुक्याची दुलई आणि थंडीचा कडका पर्यटक अनुभवत आहेत. महाबळेश्वर पाचगणीला आलेल्या पर्यटकांना आज एकदम नवा अनुभव आला. सकाळी पर्यटक फिरण्यासाठी बाहेर पडले असता वेण्णा लेक परिसरात एकदम ढग उतरल्याने स्वर्गसुखाचा अनुभव पर्यटकांनी घेतला.
सर्वत्र दाट धुके होते. अशीच परिस्थिती पाचगणी शहरातही दिसून आली. पाचगणी शहरावरही टेबल लँड वरून ढग उतरल्याचे दिसून आले. दोन्ही शहरांवर ढग उतरल्यामुळे एकदम भन्नाट दृश्य दिसून आले .पर्यटक वातावरणातील बदलाचा आनंद घेत आहेत. पर्यटकांना महाबळेश्वर, पाचगणीमध्ये आज सकाळी जणू ढगच जमिनीवर आल्याचा भास होत होता. धुक्याची दुलई पसरलेली होती. रोमँटिक वातावरण, धुक्याची दुलई, ढगच जमिनीवर असल्याचा अनुभव पर्यटक घेत होते. सध्या पाचगणी महोत्सव (फेस्टिव्हल)ची धामधूम सुरु आहे. हा नजारा पाहून पर्यटक एकदम खुश झाले.