Editor: Mr. Shrikrishna Aayacit, Executive Editor: Mr. Sanjaykumar Joshi
 Top Advertisement's

 Pandharpur

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान, पंढरपूर तालुक्यात द्राक्ष बागांचे नुकसान

Xtreme News India   30-11-2023 13:32:12   83675

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान,

पंढरपूर तालुक्यात द्राक्ष बागांचे नुकसान 

 

पंढरपूर दि. ३० (प्रतिनिधी) -  महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत  आहे. ठिकठिकाणी रिमझिम ते अवकाळी पाऊस झाल्याची दृश्य पाहायला मिळाली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. राज्यात सोलापूर, सांगली, अहमदनगर, वाशिम, पुणे,बीड जिल्ह्यात पाऊसाने झोडपले आहे. विदर्भात काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडत असल्याची माहिती मिळत आहे. राज्यात पावसासह गारपीठ देखील पडत आहे. त्यामुळे पीकांचे नुकसान होताना दिसत आहे.

     दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात ११ हजार एकरावरील द्राक्ष बांगाना अवकाळी पावासाचा फटका बसला आहे. सलग तिसऱ्या वर्षी द्राक्ष बांगाचे नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. आज पहाटे पंढरपूर तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झाल्याची माहिती मिळाली आहे. अवकाळी पावसामुळे द्राक्ष आणि डाळिंब बागांचे नुकसान झाले आहे. सलग ती वर्षांपासून पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी सतत संकटात सापडला असून त्यांना अवकाळी पावसाचा सामना करावा लागत आहे.

    द्राक्षाच्या उत्पादनासाठी दीड ते दोन लाख खर्च येत असतो. परंतु सरकारकडून तुटपुंजी मदत मिळते. दोन दिवसांपुर्वी नाशिक जिल्ह्यात द्राक्षांच्या बांगाचे नुकसान झाले होते त्यावेळी मंत्री दादा भुसे यांनी नुकसानाची पाहणी केली होती. अवकाळी पावसामुळे द्राक्ष बांगावर डावणी, भुरी या रोगांचा प्रार्दुभाव वाढला आहे. दरम्यान द्राक्षांच्या अति नुकसानामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी मागितली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आता सरकार मदत करेल अश्या आशेवर बसला आहे.

 


Contact For News & Advertisement.


 Your Feedback



 Advertisement