बुलढाणा जिल्ह्यात ३४ हजार हेक्टरवरील पिकांची हानी,५२ घरांची पडझड
बुलढाणा दि.२८ (प्रतिनिधी) - मागील दोन दिवसात पडलेल्या अवकाळी पावसामुळे ३३ हजार ९५१ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्हा कृषी अधीक्षक मनोजकुमार ढगे यांनी जिल्हाधिकारी किरण पाटील यांना हा प्राथमिक अहवाल सादर केला आहे.
नांदुरा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १० हजार ६७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. याखालोखाल सिंदखेडराजा तालुक्यातील ७९८५, देऊळगाव राजा ७६१०, लोणार मधील ७६०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये तूर, कपाशी, ज्वारी, भाजीपाला, फळबागांचा समावेश आहे.
दुसरीकडे सिंदखेडराजा व देऊळगाव राजा तालुक्यातील १००६ भाजीपाला बीजोत्पादन करणारया शेडनेटची नासाडी झाली आहे. जिल्ह्यात ५२ घरांची अंशतः पडझड झाली असल्याचे अहवालात नमूद आहे.