मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे सहकुटुंब दर्शन
Xtreme News India
22-11-2023 13:13:41
82909
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे सहकुटुंब दर्शन
कोल्हापूर दि. २२ (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोल्हापूर येथे करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिराला भेट देऊन सहकुटुंब दर्शन घेतले. तत्पूर्वी कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्वागत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केले. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यामध्ये सर्वांना सुखसमृद्धी लाभावी, अशी मागणी देवीकडे केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Contact For News & Advertisement.