भंडाऱ्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमात गोंधळ,
अजित पवारांचे भाषण सुरु असताना घोषणाबाजी
भंडारा दि. २० (प्रतिनिधी) - भंडाऱ्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना गोंधळ झाल्याची माहिती समोर येत आहे. पूर्ण करा नाही तर खुर्च्या खाली करा अशी घोषणा देत हातातले बॅनर फडकावले. दरम्यान या व्यक्तीला पोलिसांना तात्काळ ताब्यात घेऊन कार्यक्रम स्थळावरुन बाहेर नेले. राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन घमासान सुरु असल्याचं चित्र आहे. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करत होते. त्याचवेळी हा गोंधळ झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
आरक्षण देताना ते सुप्रीम कोर्टात टिकलं पाहिजे. इतर समाजालाही त्यामुळे कोणत्याही प्रकारचं नुकसान होता कामा नये, असे प्रयत्न सरकार करत आहे. मात्र, काही लोक वेगळ्या पद्धतीचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप अजित पवारांनी त्यांच्या भाषणातून केला आहे.